उन्हाळ्यात सापांना वाचवा; वन्य पशूपक्षी संरक्षण संस्थेचे आवाहन




पेरमिली;-उन्हाळ्यात 'हे' साप ठरू शकतात जीवघेणे, दिसले तर त्वरित सावध व्हा 

उन्हाळा हा सापांच्या हालचालीसाठी अत्यंत अनुकूल ऋतू असतो. उष्णतेमुळे साप सावली आणि थंड जागा शोधत असतात. आज वस्तीत  विषारी नाग साप आडळल्याने सुखरूप पकडुन सुंदर जिवन जगण्याचा मार्ग सर्पप्रेमी नवरत्न सोनवाने यांनी दाखवले तसेच

उन्हाळा हा सापांच्या हालचालीसाठी अत्यंत अनुकूल ऋतू असतो. उष्णतेमुळे व जगलात वणवा लागल्याने साप सावली आणि थंड जागा शोधत असतात. त्यामुळेच जंगल, शेती, बाग, घराच्या परिसरात किंवा ओलसर ठिकाणी त्यांचा जास्त प्रमाणात वावर वाढतो. 




उन्हाळ्यात काही साप विशेषतः आक्रमक आणि धोकादायक होतात. अशा सापांच्या विषाची ताकद अधिक असल्याने सर्पदंश हा जीवघेणा ठरू शकतो. उन्हाळ्यात कोणते साप अधिक खतरनाक असतात आणि त्यांच्यापासून व दिवसा किंव्हा रात्रीच्या वेळी विषारी साप आढळल्यास संपर्क साधावा व जीवाची बाजी न लावता काळजी घ्यावी, असे आवाहन सर्पप्रेमी नवरत्न सोनवाने यांनी केले. 





वन्यजीवप्रेमी साई चंदनखेडे  यांचे म्हणने आहे की, उन्हाळ्यात गवत, झाडी, नदीपाठ वा पाणवठ्याचा भाग उष्णतेमुळे सुकून जात असताना सर्पांच्या प्रजातींचा निसर्गअधिवास धोक्यात येत असतो. त्यामुळे बऱ्याचदा साप गावातील वस्तीत दिसून येत असतात, अशा वेळेस सापांबद्दलचे अज्ञान वा भितीपोटी मनुष्यांकडून त्यांची सर्रास हत्या  केली जाते. परंतु हे नष्ट होत जाणारे साप निसर्गाचा समतोल राखण्याचे काम करीत आहेत हे माञ खरं.

Post a Comment

0 Comments