अहेरी;-अवैध उत्खनन करून बादशाहगिरी करणाऱ्या एका कंत्राटदाराला अहेरी तहसीलदारांनी चांगलाच धळा शिकविला आहे,
सदर तहसीलकार्यालयातून एनओसी प्राप्त झाल्याशिवाय कामाचे देयके थांबविण्याचे आदेश दिले आहे,
अवैध रेती तस्करी केल्याचे आरोप सिद्ध झालेले कंत्राटदार मे,जी,एस,डी, इंडस्ट्रीज नागपूरचे गजानंद मेंढे या कंत्राटदाराने चंद्रा येथील शेतकऱ्याच्या शेतात अवैधरित्या उत्खनन केलेली रेतीचा मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवली होती,
सदरची रेती भामरागड तालुक्यातील लीलावातील येचली नदी घाटातून उत्खनन न करता इतरत्र ठिकाणावरून रेती आणल्याचे समोर आले,
त्या नंतर चौकशी केली असता ४६६.४३ ब्रास रेतीसाठा अवैध असल्याचे आढळून आले,
त्यानंतर तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी संबंधित कंत्राटदार व कंपनीला ८४,३४,६०० रुपयांचा दंड ठोठावला परंतु सहा महिने उलटूनही दंडाची रक्कम न भरल्याने आलापल्ली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या उपभियंत्याना पत्र लिहून संबंधित कंत्राटदाराने देयके थांबविण्याचे आदेश दिले
बॉक्स;-शासनाची फसवणूक व दिशाभूल करणाऱ्या अशा कंत्राटदाराला तहसीलदाराने दिलेल्या आदेशाचे स्वागत आहे.व सदर कंत्राटदाराचे अजून काही प्रकरण येत्या काही दिवसात समोर येणार
संतोष ताटीकोंडावार
जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती जिल्ह्याध्यक्ष
0 Comments