मागील वर्षीच्या तेंदुपत्ता मजुरी न मिळण्यास कारणीभूत सूत्रधारांच्याच हाती पुन्हा यंदाच्या तेंदुपत्त्याची सूत्रे! आंबटपल्ली ग्रामपंचायतीतील लाजीरवाणा प्रकार






आंबटपल्ली: मागील वर्षीच्या तेंदुपत्ता संकलन मजुरी न मिळाल्यामुळे शेकडो मजुरांचे आर्थिक हाल झाले. मजुरी मिळविण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला, मात्र कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नाही.


आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यंदा पुन्हा त्याच व्यक्तींना तेंदुपत्ता संकलन व वितरणाची सूत्रे देण्यात आली आहेत. स्थानिक नागरिक व मजुरांमध्ये तीव्र नाराजी असून, हे कृत्य सरळसरळ अन्यायकारक आणि आर्थिक शोषणाचे उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


मागील वर्षी मजुरी न मिळण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींना पुन्हा संधी देणे हा लाचखोरी आणि स्वार्थी राजकारणाचा नमुना असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करून मजुरांना त्यांच्या थकित मजुरीची रक्कम मिळवून द्यावी, तसेच दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

तहसिलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

यासंबंधीची  निवेदन वजा तक्रार आंबटपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिचेला, कोडीगाव,कोडीगाव टोला आणि येरमेटोला येथील तेंदुपत्ता मजुरांनी तहसिलदार मुलचेरा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन पाठवून मजुरी मिळवून देण्यासाठी विनंती व संबंधीत दोषी ग्रामकोष समिती अध्यक्षांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी तक्रार देण्यात आली.  याची चौकशी सुरू आहे,


पोलीस निरिक्षक यांच्यामार्फत पोलीस अधिक्षक यांना निवेदन वजा तक्रार


आंबटपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोडीगाव, कोडीगाव टोला, चिचेला आणि येरमेटोला येथील तेंदुपत्ता मजुरांनी ११ महिन्यांचा काळ लोटूनही मजुरी न मिळाल्याने शेवटचा प्रयत्न म्हणून पोलीस निरीक्षक मुलचेरा यांच्याकडे मजुरी मिळवून देण्याकरिता निवेदन व याप्रकरणातील दोषी ग्रामकोष समिती अध्यक्षांवर व सुत्रधारांवर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी म्हणून तक्रार देण्यात आले.

 या तक्रारीचे पोलीस निरक्षक मुलचेरा यांनी जातीने लक्ष देऊन सदर तक्रार निकाली काढण्याचा परिपूर्ण प्रयत्न करित आहेत.



मुजोरीने ग्रामपंचायत तर्फे लिलावाची जाहिरात काढण्यात  आली,त्या आणि माध्यमांवर प्रकाशित करण्यात आली, व येत्या ७ एप्रिलला लिलावाची प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे,जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षकांना तक्रार देऊन दोंषींवर कारवाही किंवा या गोष्टीचा निवारण होण्यापूर्वीच जाहिरात काढून लिलावाची प्रक्रिया राबविणे ही तर सरासर ग्रामपंचायतीची मुजोरी आहे.पैसे घेऊन खोटा करारनामा करणाऱ्या ग्रामकोश समिती अध्यक्षांवर कार्यवाही करण्याऐवजी त्यांनाच सोबत घेऊन लिलावाची प्रक्रिया राबविणे हे कितपत योग्य आहे,

माहितीप्रमाणे गेल्या वर्षीचा तेंदूपत्ता पैसा न मिळण्याचा मुख्य सूत्रधाराने जाहिरातीची प्रक्रिया राबविली आहे.लिलावाची प्रक्रिया दाखविण्यापूर्त व मलाई लाटण्याचा प्रयत्न जास्त, यात काही शंका नाही.यंदाही त्याच व्यक्तींकडून लिलाव घेण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


Post a Comment

0 Comments