एटापल्ली:- येथिल नगरपंचायत समोर सुरु असलेल्या त्या कमला गॅस एजन्सीवर स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेची गांभिर्यता लक्षात घेत माहिती अधिकार महासंघ कार्यकर्ते विश्वदीप वाळके यांनी पुरवठा अधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,यांना दिनांक ४ /३/ २०२५ रोज मंगलवारला तक्रार केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, एटापल्ली येथिल नगरपंचायत समोर सुरु असलेली कमला एच.पी. गॅस एजन्सी ही मागील काही वर्षांपासून गॅस सिलेंडरची विक्री करीत आहे. मात्र शासकिय नियमांनुसार आवश्यक असलेले गोडावून त्यांच्याकडे उपलब्ध नाही,असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आले होते.
सदर माहिती मिळताच माहिती अधिकार महासंघ कार्यकर्ते विश्वदीप वाळके यांनी सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेत याची सखोल चौकशी केली असता असे आढळून आले की कमला गॅस एजन्सीचे गोडावून हे मौजा - ताडगाव ता. भामरागड याठिकाणी असल्याची माहिती मिळाली.
सदर गॅस एजन्सी ही गॅसने भरलेले सिलेंडर विक्रीकरीता दुकानात आणि आपल्या राहाते घरी म्हणजेच एटापल्ली येथे ठेवत असल्याचे सिद्ध झाले, या दोन्ही ठिकाणी ( दुकानात व घरी) दाट लोकवस्ती असुन या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास राहातात. अशा परिस्थितीत जर कोणताही अनुचित प्रकार घडुन दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी घेणार तरी कोण? असा गंभीर सवाल देखील स्थानिक नागरिकांकडुन करण्यात आल्यानंतर खबरदार महाराष्ट्र न्युज नेटवर्क ने ही बातमी प्रकाशित करून सदर बाब ही किती गंभीर आहे याची जाणीव करुन दिल्यानंतरही सदर गॅस एजन्सीने नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेत कोणतेच उपाययोजना केले नाही.
सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक स्थिती
शासकिय नियमानुसार, गॅस सिलेंडरचे साठवण हे गोडाऊनमध्ये असणे व हे गोडाऊन गावाच्या किंवा शहराच्या बाहेर सुरक्षीत ठिकाणीच असणे बंधनकारक आहे, असे असतांना देखील कमला गॅस एजन्सीने या गोष्टींकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने दुर्घटनेचा धोका आहे हे लक्षात येताच माहिती अधिकार महासंघ कार्यकर्ते विश्वदीप वाळके यांनी या कमला गॅस एजन्सीवर नियमांचे उल्लंघन करणे व नागरिकांच्या सुरक्षिततेची पायमल्ली करीत असल्याने पुरवठा अधिकाऱ्यांकडे याविषयाची तक्रार केली आहे.
प्रशासन सदर बाबीकडे लक्ष देणार काय ? असा सवाल स्थानिकांकडुन उपस्थित केला जात आहे.
0 Comments