तालुका प्रतिनिधी अनिल कांबळे
... वर्दळीच्या ठिकाणी पोलीस शिपायाची नेमणूक करावी. यासाठी ठाणेदार यांना दिले निवेदन..
.. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झालेली घटना अतीशय निंदनीय, माणुसकीला काळीमा फासणारी घटना तर गडचिरोली जिल्ह्यातील शिवनी येथील आणखी एका युवतीवर, बलात्काराचे प्रमाण वाढतच आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमाचा ब्रह्मपुरी तालुका वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे निषेध नोंदविण्यात आला.
महाराष्ट्रासारख्या शांतप्रिय राज्यात बंधू भाव व सलोख्यांचे नाते संबंध जपून वावरणाऱ्यां महिलांच्या सुरक्षेसाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ठिकठिकाणी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमाना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. शिवाय आरोग्य नगरी व शिक्षण नगरी म्हणून प्रख्यात असलेल्या ब्रह्मपुरी सारख्या शांतप्रिय शहरात बऱ्याच चौकातील गर्दीच्या ठिकाणी महिलांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे युवतीच्या छेडछाळीची घटना होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांचे नियंत्रण ठेवावे. म्हणून शिपायाची त्या ठिकाणी नियुक्ती करावी. असे निवेदन ब्रह्मपुरी शाखा वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने ब्रह्मपुरीचे ठाणेदार प्रमोद बानबले यांना दिले आहे. यावेळी निवेदन देतांना चंद्रपूर वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा ऊपाध्यक्षा लिनाताई रामटेके, चंदा माटे, लता मेश्राम,वंदना कांबळे, शीला निहाटे, नीरू खोब्रागडे,अनुपमा जनबंधू
वंदना नंदेश्वर,वंदना कावळे व इतर कार्यकर्त्यां उपस्तीत होते
0 Comments