देसाईगंज;- दिनांक .१३/०३/२०२४ होळी हा हिंदू धर्मातील एक लोकप्रिय सण आहे जो वसंत ऋतुच्या आगमनाचे आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो अश्या या पावण सणा निमित्य आज दिनांक 13 मार्च 2025 रोज गुरुवारला आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, देसाईगंज मध्ये प्रेम आणि उत्साहाने पर्यावरणपूरक रंगोस्तव सोहळा नैसर्गिक रंगनिर्मिती करून साजरा करण्यात आला या रंगोस्तव सोहळा च्या कार्यक्रमाला अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. श्री. डी. डी. शिंगाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापिका सौ. एस. पी. प्रधान, पर्यवेक्षिका सौ. डी. व्ही. चौहाण, प्रा. एस. आर. शर्मा, प्रा. व्ही. यु. सयाम, श्री. एस. ए. कवासे सर, कु. जे. ए. लांजेवार, श्री. नरेंद्र बरडे ( प्रयोगशाळा सहा.) उपस्थित होते. आजचा हा रंगोस्तव सोहळा महाविद्यालयचे जेष्ठ शिक्षक मा. आर. जी. मस्के सर यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनातून आणि प्राचार्य मा. डी. डी. शिंगाडे सर यांचा मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला या रंगोस्तव सोहळ्यात मधे पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगनिर्मिती केल्या गेली या नैसर्गिक रंगनिर्मितीसाठी बिट, पालक, सांबार, ब्लॅक बेरी, आंबाडी, मुलतानी मिट्टी, काथ, पळसाची फुल, झेंडूची फुल, कडुनिंब पान, हळद, लिंबू, चुना, तांदूळ पिठ व डाळीचे पिठ आणि दुध वापरण्यात आले, गुलाबी रंग बिटपासून, हिरवा रंग पालक, सांबार आणि कडुनिंबची पाने, केशरी रंग पळसाची फुल, कत्था रंग हळद, चुना, लिंबू, पिवळा रंग हळद, डाळी व तांदुळाचे पिठ, जांभळा रंग ब्लॅक बेरी, लाल- गुलाबी रंग लाल आंबाडी पासून तयार करण्यात आले आणि पर्यावरणपूरक रंगापासून रांगोस्तव साजरा करण्यात आले. या सोहळ्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, पारध्यापक वृंद, शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक रंग खेडून रंगोस्तव साजरा केला. होळी हा सण एक आनंद आणि उत्साहाचा सण आहे जी प्रेम, मैत्री, आणि चैतन्याचे प्रतीक आहे. दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश, महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी समस्त जनतेला आपण सुद्धा पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक रंगानी रंगोस्तव साजरा करावे ही विनंती केली आणि सर्व विद्यार्थी आणि समस्त जनतेला होलिका दहन आणि रंगपंचमी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0 Comments