येरमाटोला;-आंबटपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून भिका नंदा सिडाम ते गणपत तलांडे यांच्या घरापर्यंत करण्यात आलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता विश्वदीप वाळके यांनी केला आहे. त्यांनी दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मूलचेरा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, सदर नाली बांधकाम अंदाजपत्रकानुसार न करता अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून, या कामात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी सरपंच, ग्रामसेवक, कंत्राटदार आणि अभियंता यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
सदर तक्रारीची प्रत विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आली आहे.
या तक्रारीमुळे आंबटपल्ली ग्रामपंचायतीतील निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.
0 Comments