गडचिरोली;- दुब्बागूडा बांडिया नदीवर पुलाचे सुरू असलेले बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संबंधित कंत्राटदाराकडून नदीतील रेती अनधिकृतरीत्या उपसली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये स्थानिक वनकर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.
भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वदीप वाळके यांनी याबाबत मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, कंत्राटदाराने बांधकामासाठी अधिकृत परवाना न घेता नदीतील रेतीचा वापर केला असून, संबंधित वनकर्मचारी याची दखल घेतली नाही.
“कंत्राटदार व वनकर्मचारी यांच्यात संगनमत असून पर्यावरणाचा व वनसंपत्तीचा मोठा ऱ्हास होत आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि कंत्राटदाराकडून पाच पट दंड वसूल करावा,” अशी मागणी वाळके यांनी केली आहे.
तसेच, त्यांनी इशारा दिला आहे की जर 20 एप्रिलपूर्वी कारवाई न झाल्यास, गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
सदर प्रकरणामुळे स्थानिक प्रशासन आणि वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, याबाबत लवकरात लवकर तपास होणे गरजेचे ठरत आहे.
0 Comments