देसाईगंज तालुका प्रतिनिधी // अंकुश पुरी
देसाईगंज – तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीत राजकीय नाट्याला नवे वळण मिळाले असून, उपसरपंच पदावरून अपात्र ठरविण्यात आलेले धनंजय तिरपुडे यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांत कोरेगाव ग्रामपंचायतीत सतत राजकीय घडामोडी घडत असून, यापूर्वी सरपंच व तीन सदस्य अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसातच उपसरपंच पद देखील रिक्त झाले होते.
धनंजय तिरपुडे यांनी अपात्रतेविरोधात अपील दाखल करत स्टे मिळवला असून, त्याच्या अनुषंगाने त्यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीतील आणखी एका सदस्यावर अपात्रतेची तलवार टांगलेली असल्याने कोरेगावमधील स्थानिक राजकारण पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे.
या सततच्या घडामोडीमुळे कोरेगाव व परिसरातील नागरिकांचे लक्ष ग्रामपंचायतीच्या पुढील राजकीय वाटचालीकडे लागले आहे.
0 Comments