आंबटपल्ली;- ग्रामपंचायत हद्दीतील तेंदूपत्ता मजुरांना मागील वर्षीच्या थकीत मजुरीचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसतानाच सुरू झालेल्या लिलाव प्रक्रियेविरोधात ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मूलचेरा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत आज दिनांक ७ एप्रिल रोजी सदर लिलाव प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी आपल्या अर्जात मागणी केली होती की, जोपर्यंत मागील वर्षाचे पैसे मजुरांना अदा होत नाहीत आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत कोणताही नवीन लिलाव होऊ नये. यासोबतच, ग्रामकोष समिती बरखास्त करून नवीन लोकाभिमुख समिती स्थापन करण्याचीही मागणी करण्यात आली होती.
गटविकास अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून, आता पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments