विशेष जनसुरक्षा विधेयक तात्काळ मागे घ्या वंचित बहुजन आघाडीची मागणी



तालुका प्रतिनिधी//अनिल कांबळे 


राज्यातील जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तसेच भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारे शिवाय माणुसकीची हत्या करणारे विशेष जनसुरक्षा विधेयक भाजप महायुती सरकारने नुकतेच विधिमंडळात बहुमताच्या जोरावर मंजुर करुन घेतले आणि ते राज्याच्या सामान्य जनतेवर लादले. मुळातच या जनसुरक्षा कायद्याच्या आडुन दलित, आदिवासी, कष्टकरी, श्रमिक, कामगार, महिला, शेतकरी, युवक, विद्यार्थी आणि राज्यातील  फुले शाहु आंबेडकरी तथा वंचित घटकातील जनसंघर्ष संघटित करणाऱ्या पुरोगामी व डाव्या विचारसरणीच्या पक्ष - संघटनांना  हेतु पुरस्पर टार्गेट करून अर्बन नक्षलवादी ठरविण्याचा या सरकारचा हेतु आहे. तेव्हा या जटिल क्लिष्ट काळ्या स्वरूपाच्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी तसेच हा काळा कायदा रद्द करण्यासाठी तालुकाध्यक्ष लिलाधर वंजारी यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रम्हपुरी च्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्फत सरकारला निवेदन देऊन हा काळा कायदा मागे घेऊन रद्द करण्याची मागणी करण्यात आली. हि मागणी पुर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी कडुन तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा ईशारा सुध्दा यावेळी शासन प्रशासनाला देण्यात आला. यावेळी जेष्ट कार्यकर्ते डॉ प्रेमलाल मेश्राम, जिल्हा उपाध्यक्षा महिला आघाडी लिनाताई रामटेके, ता महासचिव नरेंद्र मेश्राम, डि एम रामटेके.  तालुका उपाध्यक्ष अनिल कांबळे, भिम आर्मी तालुका प्रमुख प्रभु लोखंडे, युवा अध्यक्ष रतन लांडगे, ता महासचिव महिला आघाडी सुकेशिनी बन्सोड, , मिलिंद घोरमोडे,किरण मेश्राम, प्रतिभा डांगे, लता मेश्राम, निरुताई खोब्रागडे, विजया खोब्रागडे, शारदा घोरमोडे, नागेश फुले, अखिल कांबळे, प्रफुल फुलझेले, जगदिश भशाखेत्रे, एस के टेंभुर्णे, सुजाता मेश्राम, विश्वनाथ खोब्रागडे तसेच असंख्य शेकडो फुले शाहु आंबेडकरी समाजबांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments