गोमनी;- गोमनी गावात स्थापन करण्यात आलेला पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अनेक महिन्यांपासून अक्षरशः बंद अवस्थेत आहे. वर्षभर हा दवाखाना बंद असून येथे नियुक्त असलेला शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी नियमित अनुपस्थित राहतो विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर कोणतीही जबाबदारी पार न पाडता शासनाकडून नियमित पगार घेत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आणि निषेधार्त आहे.वर्षानुवर्षांपासून या दवाखाण्यात भौतिक सुविधांचा देखील अभाव आहे.
सध्या पावसाळा सुरु असून शेतीची कामे युद्धपातळीवर सुरु आहे.या पावसाळ्यात वेगवेगळ्या बिमारीने पशुधन देखील मोठ्या प्रमाणावर आजारी पडण्याची शक्यता नाकारता येतं नाही . जनावरांना अपघात, जखमा किंवा रोग झाल्यास उपचारासाठी ग्रामीण भागात पर्यायच उरत नाही. अशा परिस्थितीत गोमनी परिसरातील शेतकरी आणि पशुपालक यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दवाखाना असूनही सेवा मिळत नाही, यामुळे शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या निष्क्रियतेविरोधात भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. विश्वदीप वाळके यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. "संबंधित डॉक्टरवर त्वरित शिस्तभंगाची कारवाई करीत नवीन जबाबदार डॉक्टरची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
प्रशासनाच्या व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एकीकडे शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे शासकीय निधीचा गैरवापर होत आहे.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
0 Comments