प्रतिनिधी //साई चंदनखेडे
पेरमिली;-गावात दर सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात सर्वत्र चिखल झाला आहे. बाजारातील सिमेंट ओट्यांच्या शेडमध्ये चिखल जमा असुन उर्वरित भागात रस्त्यांची वाट लागली आहे. जुनी बाजारवाडी परिसरातील वाढीव बाजार असुन दुकाने बसण्याच्या ठिकाणीं भागात पावसाने तळे साचून सर्वत्र चिखल झाला आहे. साचलेल्या डबक्यांमध्ये दगड, विटा ठेवून त्यावरुन ये-जा करावी लागते. भाजी खरेदी करण्यासाठी आधी चिखल तुडवा मगच भाजीपाला घ्या अशी जणू शिक्षा मिळतेय. सोमवारच्या आठवडे बाजारात बाजारातील सर्वच भागांतील रस्त्यांची स्थिती बिकट आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना आधी चिखल तुडवावा लागतो. भाजी बाजारातील ओट्यांचा भागात विक्रेते बसतात. या सर्व प्रमुख ओट्यांचा मार्गावर चिखल वाढला असून काही ठिकाणी रस्त्यांवर तळे साचले आहे. त्यातून ये-जा करताना कसरत होते. ग्रामपंचायत कोणत्याही सुविधा देत नसल्याने विक्रेत्यांसोबतच ग्राहकांनी संताप व्यक्त केला.
महसूल मिळूनही सुविधांची बाजारापासून ग्राम पंचायतला दरवर्षी बाजारमक्ता, या माध्यमातून लाखोंचा महसूल मिळतो. यामुळे विक्रेते व ग्राहकांना सुविधा देणे ग्रामपंचायतची जबाबदारी आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष होते. बाजारातील रस्ते काँक्रिटचे नसल्याने चिखल होत आहे. सोमवारच्या आठवडे भाजीपाला बाजारात सततच्या पावसामुळे चिखलातून वाट काढताना ग्राहक, दुकानदार, तसेच व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांनी बाजार समितीने कडे आठवडी बाजारात मुरुमीकरण टाकण्याची मागणी केली आहे. पेरमिली येथील बाजारात भाजीपाला इतर वाण-सामान व धान्य बाजार बाजार भरतो. बाजार समितीच्या अखत्यारीतील पेरमिली उपबाजार आहे. येथील सोमवारच्या आठवडे भाजीपाला बाजारात, शेतकरी वर्ग भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. तसेच भाजीपाला व्यापाऱ्यांचीही दुकाने असतात. याठिकाणी परिसरातील ग्रामस्थ व आजूबाजूच्या भागातील नागरिक भाजीपाला खरेदीसाठी येत असतात. गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसाने भाजीपाला बाजारात चिखल साचल्याने, बाजारकरुंना दलदलीतून मार्ग काढताना कसरत करत चालावे लागते. दरम्यान, येथील भाजीपाला बाजारात चिखल झाल्याने मुरुमीकरण करण्याची गरज आहे. याठिकाणी पेरमिली बाजार समितीने मुरूम टाकून, तातडीने मुरुमीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
0 Comments