देसाईगंज;-नूतन शिक्षण प्रसारक मंडळ (हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था) द्वारा संचालित आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज येथे दिनांक 4 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रकमेचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मोतिलालजी कुकरेजा (सचिव) तर विशेष अतिथी मा. जगदीशजी शर्मा (अध्यक्ष) होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. कु. गायत्री सुधीर सोनटक्के (MBBS) व मा. स्मित मडावी (M.Tech Chemical) हे माजी विद्यार्थी होते.
सत्कारमूर्ती म्हणून मा. डॉ. शंकर कुकरेजा (से.नि. प्राचार्य), मा. प्रा. जे. पी. देशमुख, मा. आशाबाई उईके, मा. नरेंद्र बरडे यांचा विशेष सन्मान झाला.
प्रमुख पाहुण्यांमध्ये मा. प्रमोद चिलवे (उपाध्यक्ष), मा. ओमप्रकाश अग्रवाल (सहसचिव), मा. योगेश नाकतोडे (कोषाध्यक्ष), मा. डॉ. श्रीराम गहाणे (प्राचार्य), प्रा. डी. डी. शिंगाडे, श्रीमती एस. पी. प्रधान, श्रीमती डी. व्ही. चव्हाण, आर. बी. गायकवाड यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. डी. शिंगाडे यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शन मा. मोतिलालजी कुकरेजा यांनी दिले. सूत्रसंचालन प्रा. पंकज धोटे, कु. माधुरी नाकाडे, कु. मोनाली बडोले यांनी केले. रेशिम गायकवाड सर यांनी आभार मानले. समारोप राष्ट्रवंदना घेऊन करण्यात आला.
हा कार्यक्रम शालेय परिवारासाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.
0 Comments