ग्वालियर मध्यप्रदेश येथील घटनेचा केला निषेध बौद्ध समाज बांधवांनी दिला भव्य धरणा




 ब्रम्हपुरी:-प्रतिनिधी, अनिल कांबळे 

 मध्यप्रदेश येथील ग्वालियर उच्च न्यायालयातील ही घटना संपुर्ण देशाला हादरवुन सोडणारी आहे. घटनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती धातुचा पुतळा न्यायालयाच्या आवारात बसविण्यासाठी उच्च न्यायालयाने मंजुरी देऊन त्यासाठी लागणारा निधी सुध्दा मंजुर झाला. पुतळा बसविण्यासाठी न्यायालयाच्या आवारात आणण्यात आला मात्र बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी बसविण्यात येऊ नये यासाठी मनुवादी प्रवृत्तीच्या ऍड. अनिल मिश्रा, ऍड. पवन पाठक, ऍड. गौरव व्यास या वकिलांनी विरोध करुन पुतळ्याचं उदघाटन न करता तो पुतळा वापस पाठविण्यास भाग पाडले. शिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली नाही तर ती घटना बी एन राव यांनी लिहिली आणि डॉ आंबेडकर हे फक्त बि ए शिकले होते असे मिडिया वर येऊन या वकिलांनी वक्तव्य केलं आणि जाहीरपणे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. हि सर्वात मोठी महापुरुषाची अवहेलना असुन अशा जातीवादी व विकृत मानसिकतेच्या या वकिलांवर मध्यप्रदेश सरकारने देशद्रोहाचा गुन्हा नोंदवुन कठोरात कठोर शिक्षा करुन त्यांना फाशी द्यावी. या मागणीसाठी बौध्द समाज ब्रम्हपुरी तालुक्याचे वतीने भव्य धरणे आंदोलन करुन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले तसेच मागणी पुर्ण न झाल्यास यापेक्षाही मोठ्या तिव्र आंदोलनाचा ईशारा सुध्दा देण्यात आला. धरणे आंदोलनाच्या अध्यक्ष स्थानावरून डॉ प्रेमलाल मेश्राम यांनी तर प्रमुख उपस्थिती म्हणुन  अशोक रामटेके, देवेश कांबळे, संतोष रामटेके, जिवन बागडे, प्रशांत डांगे, प्रभु लोखंडे, नरेश रामटेके, प्रतिभा डांगे, ऍड. नंदेनी पाटील, सुधाकर पोपटे, रोशन मेंढे, झगडीदास रामटेके, सत्यवान राऊत यांनी आपले मनोगतातुन तिव्र निषेध केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी एम रामटेके यांनी केले तर उपस्थितांचे आभार आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचं योगदान लिलाधर वंजारी यांनी केलं. शिवाय कार्यक्रमाला विशेष तन मनाने सहकार्य अनंता मेश्राम, अनिल कांबळे सुकेशनी बन्सोड, करुणा मेश्राम, यांनी केले. यावेळी संपुर्ण तालुक्यातून शेकडो समाजबांधव  उपस्थित राहुन धरणा यशस्वी करुन घडलेल्या घटनेचा निषेध केला.

Post a Comment

0 Comments