LDO राठोड यांचा बेजबाबदार उद्धटपणा गोमनी दवाखाना बंद तरीही अधिकारी मोकाट!पत्रकारांशी उद्धट बोलणारा LDO; जनतेच्या व्यथा खिजगणतीत नाहीत!




गोमनी;-गोमनी येथील पशुवैद्यकीय दवाखाना वर्षभरापासून बंद असून, नियुक्त अधिकारी हा नियमित अनुपस्थित असतानाही शासनाचा पगार गाठीशी घालतो आहे. यासंदर्भात पत्रकारांनी LDO राठोड यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, त्यांनी "माझ्या हातात काही नाही, मला फोन करायचा नाही, काहीही माहिती नाही" अशी उद्धट आणि बेजबाबदार भाषा वापरून पत्रकारांची बोळवण केली.


हा प्रतिसाद केवळ पत्रकारांचा अपमान नाही, तर तो जनतेच्या प्रश्नांचा अपमान आहे. दवाखाना बंद, डॉक्टर गायब, उपचार नाहीत, जनावरं मरतायत, शेतकरी रडकुंडीला आलेत… तरीही LDO राठोड मात्र गप्प आणि बिनधास्त!


या LDO ला दवाखान्याच्या स्थितीची संपूर्ण माहिती असूनही ते डोळेझाक करत आहेत. त्यांनी संबंधित अनुपस्थित डॉक्टरवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. हा प्रकार केवळ दुर्लक्ष नाही, तर कारवाईपासून जाणीवपूर्वक पळ काढल्याचा स्पष्ट पुरावा आहे.


दुसरीकडे, भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. विश्वदीप वाळके यांनी प्रशासनाला धडक इशारा दिला आहे — "संबंधित डॉक्टरवर तात्काळ कारवाई करून नवीन डॉक्टरची नियुक्ती झाली नाही, तर तीव्र जनआंदोलन उभं करू."


एकीकडे दवाखाना बंद, डॉक्टर गायब, आणि LDO उद्धट — हे प्रकरण केवळ हलगर्जीपणाचं नाही, तर संपूर्ण प्रशासनाच्या बेपर्वाईचं प्रतीक ठरत आहे.


प्रश्न असा की, जर LDO सारखा अधिकारी पत्रकारांशीच उद्धटपणे वागत असेल, तर सामान्य नागरिकांना न्याय मिळेल का?


हा प्रकार संशयास्पद आहे, आणि यामागे कोणते दबाव किंवा संगनमत आहे का, याची चौकशी झालीच पाहिजे.

जनतेच्या पैशाचा असा खेळ आणि अधिकाऱ्यांची मस्ती — हे सहन केले जाणार नाही. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून चौकशी सुरू केली नाही, तर भविष्यातील आंदोलनांची ठोस जबाबदारी प्रशासनावर राहील, हे निश्चित!




"शासनाचे लाखो रुपये खर्चून उभा राहिलेला गोमनी येथील पशुवैधकिय दवाखाना गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. अधिकारी गायब, डॉक्टर गायब आणि जनावरं मृत्युमुखी! या सर्वांची जबाबदारी कोण घेणार? LDO राठोड यांचा पत्रकारांशी उद्धटपणा हे केवळ असंवेदनशीलतेचं नव्हे, तर जनतेच्या हक्कांवर चाललेलं खुलेआम दडपशाहीचं दर्शन आहे.


हा प्रकार आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. संबंधित डॉक्टरवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, LDO राठोड यांची चौकशी होऊन त्यांना पदावर राहण्यास अयोग्य ठरवावं, ही आमची स्पष्ट मागणी आहे.


जर प्रशासनाने हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही जनतेसोबत रस्त्यावर उतरून निर्णायक संघर्ष करू. हा प्रश्न केवळ दवाखान्याचा नाही, तर ग्रामीण शेतकऱ्याच्या जीवसंग्रामाचा आहे. या लढ्यात आम्ही कोणतीही मागे-पुढे पाहणार नाही,"

— असा स्पष्ट इशार जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती जिल्हाध्यक्ष संतोशभाऊ ताटीकोंडावार यांनी दिला आहे.



"गोमनी सारख्या आदिवासी भागात वर्षभरापासून पशुवैद्यकीय दवाखाना बंद आहे आणि जनावरांचा मृत्यू होत असतानाही संबंधित अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. त्याहीपेक्षा अधिक लज्जास्पद म्हणजे LDO राठोड यांचा पत्रकारांशी उद्धटपणा! – हा केवळ पत्रकारांचा नव्हे, तर जनतेच्या हक्कांचा आणि लोकशाही मूल्यांचा अपमान आहे.


लोकसेवक जर लोकहितात काम करत नसेल, तर अशा ‘लोकसेवकाने’ घरीच बसावं! लोकसेवेसाठी नेमलेला अधिकारी जर दादागिरी करतो, प्रश्नांपासून पळ काढतो, तर अशा व्यक्तीला जनतेच्या कररूपी पैशांवर पगार घेण्याचा अधिकारच नाही.


हा प्रकार हलकासा नाही, तर प्रशासकीय बेजबाबदारी आणि अनास्थेचं जिवंत उदाहरण आहे. आम्ही ठाम इशारा देतो – तत्काळ त्या अनुपस्थित डॉक्टरवर कारवाई करा, गोमनीसाठी नवीन डॉक्टर नियुक्त करा. अन्यथा आम्ही भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने जनआंदोलन छेडू, आणि याची पूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनावर राहील!"


— विश्वदीप वाळके, जिल्हाध्यक्ष, भारतीय मानवाधिकार परिषद

Post a Comment

0 Comments