गडचिरोल्ली;-जिल्ह्यात चाललेल्या निकृष्ट दर्जाचे रोड व पुलाचे काम पाहता सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांनी
मुख्यअभियंता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी निवेदन दिले आहे
त्यांनी निवेदनात म्हटले की गडचिरोल्ली जिल्हा हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त व आकांशीत जिल्हा असल्याने शाषणाकडून विशेष लक्ष केंद्रित करून दुर्गम भागातील नागरिकांचा विकासासाठी अनेक क्षेत्रातून शाशनामार्फत निधी दिला जातो व 30 टक्के अतिरिक्त निधी वितरित केला जातो गडचिरोल्ली जिल्ह्यात रस्त्याचे काम हे कंत्राटदार व कंपनीला दिला जातो परंतु
गडचिरोल्ली जिल्हा नक्षलग्रस्त अशिक्षित जिल्हा असल्यामुळे कंत्राटदार व कंपनी यांचा फायदा घेऊन व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करतात रस्त्याच्या किव्हा पुलाच्या ठरविलेल्या वर्षाच्या कमी कालावधीत त्या कामाची दुर्दशा होऊन व्हिलेवाट लागते यात शासनाचा व जनतेचा कर शुल्काच्या रकमेची उधळपट्टी होते व कंपणी व कंत्राटदार मालामाल होतो
तरी आपल्या स्तरावरून विशेष लक्ष केंद्रित करून पूर्ण बांधणीचे संपूर्ण कामावर तपासणी करून कंत्राटदारांना व कंपनिंना काळ्या यादीत टाका व तसेस अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यांवर उचित दंड देऊन निलंबित करा
या वेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटिकोंडावार यांनी काही ट्रस्टच्या कामकाजबद्दल अवगत करून दिले की 1) सिरोंचा ते रेपणपल्ली सिमेंट कॉक्रीट रोड, EPC. मोडच्या अंदाजपत्रकानूसार, PQC 300 असतांना सुध्दा 225 MM करीत आहे व DLC 150 MM असतांना 120 ते 130 असे सुरू आहे. GSB Sub base 200 MM असतांना 150 ते 170
करीत आहे. 300 MM चा सब ग्रेड संपुर्ण लेअर गायब करण्यात येत असल्याचे प्रथम दर्शनास आले. पाण्याचा क्युरिंग 18 ते 21 दिवस नियमानूसार करणे अनिवार्य असतांना 7 ते 8 दिवस पाणी टाकूण काम सुरू आहे.
2) आलापल्ली ते गुड्डीगूडम 300 MM चा सब ग्रेड संपुर्ण लेअर गायब करण्यात येत असल्याचे प्रथम दर्शनास आले व आर.एम.सी. प्लॉट सदर कंत्राटदाराला अणिवार्य असतांना अर्धवट प्लॉट च्या सहाय्याने मजूरांच्या हाताने सिमेंट टाकूण मिश्रीत करून कॉक्रीट काम करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे यांच्यावर आता काय कारवाही होईल याच्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे
0 Comments