ब्रह्मपुरी प्रतिनिधी //अनिल कांबळे ,
ब्रम्हपुरी;-कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे सतत दोन वर्ष सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांना बंधने आली होती. यावर्षी बंधने हटविण्यात आल्याने माता रमाई, ब्रम्हपुरी यांच्या विद्यमाने रविवार दिनांक 05 मे 2024 ला सकाळी 10 00 वाजता शोभाताई मीटिंग हाल, सावित्रीबाई फूले विद्यालय, ब्रम्हपूरी येथे कोरोना चे सर्व नियम पाळून नि:शुल्क वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे
उपवर-वधू यांची नोंदणी सकाळी 10 00 ते 11 00 च्या दरम्यान मेळाव्या स्थळी करण्यात येईल. उपवर-वधू यांनी मेळाव्यात येतांना आपला पासपोर्ट साइज चा फोटो सोबत आणावा. विशेष सहयोग समस्त ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, उमरेड, नागपूर, देवरी, वर्धा, अर्जुनी, अहेरी, तसेच या परिसरातील खेडेगावातील बौद्ध समाज बांधवांच्या सहयोगाने या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक रमेश बागडे, घनश्याम रामटेके, यांनी केले आहे
0 Comments