अहेरी येथे कृषी दिन उत्साहात साजरा




राहुल दोंतुलवार //ग्रामीण प्रतिनिधी देवलमरी


अहेरी :- तालुका कृषि अधिकारी कार्यालय अहेरी व पंचायत समिती अहेरी यांच्या संयुक्त विदयमाने कृषि दिन उत्साहात साजरा तसेच तालुकास्तरीय कार्यक्रमाने  कृषि विभागातर्फे आयोजीत कृषि संजीवनी मोहिमेची सांगता 

 कै. वसंतराव नाईक यांच्या १२५ जयंतिनिमीत्य पंचायत समीती सभागृह,अहेरी येथे आयोजीत कार्यक्रमाची सुरुवात कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजनाने करण्यात आली. त्यानंतर  कै. वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्याबददल उपस्थीतांना माहिती देण्यात आली. सन 2023-24 अंतर्गत आयोजित पिक स्पर्धा मध्ये सहभाग घेतलेल्या शेतकरी यानी अधिक धान उत्पादन घेऊन विजेते ठरलेल्या शेतकरी यांचा यादरम्यान प्रशस्तिपत्र व पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर शेतकऱ्यांना धान व तूर बियाणे तसेच जैविक निविष्ठांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात श्री. भाऊसाहेब लावंड, कृषि अधिकारी यांनी नाचणी लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषि अधिकारी, अहेरी श्री. आनंद गंजेवार यांनी किफायतशीर शेती,‍ मुख्यपिकांबरोबरच  पर्यायी पिके, अहेरी उपविभागातील हवामानाला अनुकूल  व अधिक उत्पन्न देणारी नाविण्यपुर्ण पिके लागवड याविषयी माहि ती दि ली,  शेतातील बांधावर पिके घेऊनही उत्पन्नात कशी भर घालता येते, यामध्ये  बांधावर चारोळी, नारळ, काजु, श्रावण घेवडा, तुर यासारखी  पर्यायी पिके लागवडीविषयी माहिती दिली. तसेच सीएफआर क्षेत्रात लाख, डींक, मध, काजु लागवड यांसारखी पिके घेण्यास सांगितले. '' काजू लावा लखपती व्हा '' अशा शब्दात शेतकऱ्यांना त्यांनी काजु लागवडीसाठी आवाहन केले.  अहेरी तालुक्यातील सन १९८९ मधील कृषि भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री.  नामदेवराव आत्राम यांनी कृषि विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन अधिक उत्पादन प्राप्त करावे असे आवाहन यावेळी केले . कै. वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याबददल श्रीमती  मनिषा ठेंगरे, प्र. तालुका कृषि अधिकारी यांनी माहिती देऊन कृषि विषयक योजनाची माहिती दिली.विस्तार अधिकारी, पंचायत समिती श्री. प्रभाकर श्रीरामे यांनी शेतकऱ्यांना निविष्ठा वाटपाचे नियोजन करण्यात आले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. समीर पेदापल्लीवार तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री. अनिल चव्हाण प्र. मंडळ कृषि अधिकारी,  मंडळ कृषि अधिकारी अहेरी अधिनस्त  कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांनी प्रयत्न केले.  सदर कार्यक्रमास तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद,महीला व पुरुष बचत गटाचे सदस्य तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.कृषी विभागाचे पी. एम. किसान सन्मान निधि कक्ष हे सर्वाच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

 

राहुल दोंतुलवार //ग्रामीण प्रतिनिधी देवलमरी

Post a Comment

0 Comments