आंबटपली;-सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र हैदराबाद (तेलंगणा) येथे सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित कार्यशाळा राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 नुसार शिक्षणात बाहुली कलेची भूमिका प्रशिक्षण कार्यक्रमात दिवाकर लक्ष्मण मादेशी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबटपल्ली यांची निवड करण्यात आली.
प्रशिक्षण घेतल्यावर श्री दिवाकर माझ्याशी यांच्याद्वारे शालेय विद्यार्थ्यांना व इच्छुक शिक्षकास भावली कलेचे लाभ मिळाले या प्रशिक्षणाला बिहार,झारखंड,राजस्थान,छत्तीसगड, कर्नाटक,गुजरात तथा महाराष्ट्र आठ राज्यातून 45 शिक्षकांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्यातून केवळ तीन शिक्षक सहभागी होऊ शकले त्यात मृगया मंगेश मोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलधे - जिल्हा रत्नागिरी ,राजेश्वरी किसन पवार विद्या मंदिर नंदागिरीगाव-जिल्हा कोल्हापूर, दिवाकर लक्ष्मण मादेशी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबटपल्ली -गडचिरोली त्यांची निवड महाराष्ट्रातून या कार्यशाळेसाठी झाली सर्व राज्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी आपले आपले राज्यातील बाहुली कलेची प्रदर्शन केले आणि त्यासोबत सोबत इतर राज्यातील बाहुली बनवण्याचे प्रशिक्षण घेतले तसेच आपल्या राज्यातील सांस्कृतिक स्टेज शो द्वारा प्रदर्शन केले सीसीआरटी यांचे निर्देशक राजीव कुमार, क्षेत्रीय केंद्र अधिकारी हैदराबादचे वाई. चंद्रशेखर तथा श्रीमती सौंदर्या कौशिक कोऑर्डिनेटर यांच्या वतीने दिनांक 19 जून ते दिनांक 3 जुलै एकूण 15 दिवसाचे प्रशिक्षणाचे आयोजन केले होते प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये सहभाग शिक्षकांना सीसीआरटी हैदराबाद कडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व संस्थांद्वारा सर्व प्रशिक्षणार्थ्यांना पुतली कला , पुतली व्हिडिओ सीडी, पारंपरिक बाहुली बनवण्याची कीट देण्यात आले.

0 Comments