माओवाद्यांनी C60 जवानांवर केला IED स्फोटाचा अयशस्वी प्रयत्न




भामरागड;-धोडराज येथून अभियानावरून परत येत असलेल्या C60 जवानांवर माओवाद्यांनी IED स्फोटाचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. 


 C60 चे जवान रस्त्यावर शोध अभियान करत असताना धोडराज-भामरागड पुलाजवळ माओवाद्यांनी लोखंडी क्लेमोर ने स्फोट केला. 


 दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या आहेत.  जवानांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.  परिसरात पुढील शोध मोहीम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments