मेंटेनन्सच्या बहाण्याने महावितरण करते नागरिकांच्या जीवाशी खेळ गोमनी परिसरातील प्रकार




विभागीय संपादक//मारोती कोलावार



गोमनी: वादाच्या भोवऱ्यात असलेली वीज वितरण कंपनी नागरिकांच्या जिवाशी खेळ करतेय हे स्पष्ट दिसून येत आहे.

हा प्रकार गोमनी परिसरातील गावात दिसून येत आहे. झोतपेतून उठलेली वीज वितरण कंपनी ने कर्मचाऱ्यांना भर पावसात कर्मचाऱ्यांना मेंटेनन्स चे कामे सोपवून हिरो बनण्याचा प्रयत्न करीत आहे.या हिरोपंतीमुळे नागरिक त्रस्त झाले असून दिवसा तर सोडा रात्रीही जंगल परिसरात वीज राहत नाही.वीज कर्मचारी रात्री कोणता मेन्टेनन्स करतात देव जाणे.दिवसा डजनभर वेळा विद्युत प्रवाह खंडित होतो आणि रात्रीही डजनभर वेळा खंडित होतो. कधी कधी तर रात्रभर वीज राहात नाही.भर उन्हाळ्यात मेन्टेनन्सचे काम करण्याऐवजी भर पावसात का मेंटेनन्स करताहेत थुंकल्यासारखे पाऊस आले तरी ही विद्युत आजही जाते तर भर पावसात वीज राहील म्हणून शाश्वती कसली असे नागरिकात चर्चा आहे.

  वीज बिल मात्र अतोनात येत असतो. एखाद्या ग्राहकाकडे बल्ब, एक पंखा असेल तर त्याला १५०० ते २००० पर्यंतचा वीजबील येतो. आणि वीजबील वाटप झाल्या दुसऱ्याच दिवशी वीज कर्मचारी ५००वेक्षा जास्त विजबील असणात्या ग्राहकांची यादी प्रिंट काढुन घरोघरी जाऊन तंगी लावतो की आजच्या आज बिल भरा अन्यथा तुमची लाईट कट करू अशाप्रकारे र्या बिट लाईनमन कडुन बोलल्यानंतर सर्वसाधारण व्यक्ती कुठुनतरी उधारी उसने करून पैसाचा जुगाड करून भरण्याचा प्रयत्न करतो. पैसे भरल्या नंतरही २४ तास वीज राहात नाही यामुळे कधी कधी ग्राहकांमध्ये पुर्वीप्रमाने दिव्याच्या प्रकाशात राहावे की काय असे ही त्याला वाटु लागते.

    वीज कर्मचार्यांना अतिरिक्त वीज बिलासंबंधी विचारले असता BPL मिटर APL मध्ये गेला म्हणून जास्त बिल आला आहे. वीज ग्राहक थोडे बिल कमी करण्यास विनंती केल्यास तुम्ही काहीही करा परंतु बिल भरावेच लागेल म्हणून दिवसातून ४ वेळा येत असल्याने आपल्या इज्जतीचा विचार करून तडजोड करून पैसे भरतो ही गोमणी परिसरातील सत्य परिस्थिती आहे.

      रात्रीला लाईट गेली की या कर्मचार्यांना रात्री काम करायला भीती वाटते असे स्वतः कर्मचारीच सांगतात, म्हणुन वरिष्ठ अधिकार्‍यांनी जातीने लक्ष देऊन गोमणी परिसरातील लाईट पुर्ववत करावे अन्यथा मुलचेरा येथील वीज वितरण कार्यालयावर जनतेचा धडक मोर्चा निघाल्याशिवाय राहात नाही.


विशेष


गोमनी परिसरातील नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न 9 तारखेच्या आंदोलनाच्या स्वरूपात  करण्याच्या प्रयत्नाला कुठेतरी हातात केराची टोपली दाखवून आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला आंदोलन झाल्यास अख्या तालुक्याला महावितरणच्या भोंगळ कारभाराची माहिती होऊन बदनामि झाली असती अश्या भीतीनेतर आंदोलकांना आंदोलन नाही करू दयायचे डाव तर नाही ना

Post a Comment

0 Comments