अहेरी : आलापल्ली ते गुड्डीगुडम रस्त्यावर गिट्टीचं साम्राज्य! महिन्यांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघात, धुळीचा त्रास, नागरिक त्रस्त! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली येत्या 26 एप्रिलला गुड्डीगुडम येथे चक्कजाम आंदोलन छेडण्यात येणार आहे. अपुऱ्या रस्त्यामुळे अनेक अपघात झाले असून अनेकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
31 मार्च रोजीच कंकडालवार यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र कामाची कोणतीही हालचाल न झाल्यामुळे हे तीव्र आंदोलन छेडले जात आहे.
या चक्कजाम आंदोलनात स्थानिक नागरिक, आदिवासी विद्यार्थी संघ, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
प्रशासनाने त्वरित रस्त्याचे काम सुरू न केल्यास जनतेचा उद्रेक अनावर होईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
0 Comments