बंद सौरपंपाने गाव रखरखलं... पण एक निर्णय ठरला गेमचेंजर!




अहेरी विधानसभा क्षेत्रातील कोईनवर्षी हे अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल गाव पाण्याच्या भीषण संकटाला सामोरे जात होतं. गावातील ऊर्जेवर आधारित दुहेरी हातपंप गेल्या काही महिन्यांपासून बंद होता, त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना लांब लांबवर भटकावं लागत होतं. पण, या रखरखाटात एक निर्णय असा झाला, की गावाचं नशीबच बदलून गेलं.


किसान सभेचे गाव शाखा अध्यक्ष श्री. सत्तू हेडो यांनी ही गंभीर समस्या लक्षात घेऊन, भाकपा अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांना माहिती दिली. त्यानंतर भाकपा व किसान सभेच्या वतीने शासनदरबारी तातडीने सौरपंप दुरुस्तीची मागणी व पाठपुरावा सुरू झाला.


प्रशासनानेही या मागणीची त्वरित दखल घेतली आणि सौरपंपाची दुरुस्ती करण्यात आली. काही दिवसांतच पंप पुन्हा कार्यान्वित झाला आणि गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळू लागलं. या निर्णयामुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले असून, आदिवासी बांधवांनी भाकपा व किसान सभेचे आभार मानले आहेत.


हा संपूर्ण बदल म्हणजे भाकपा-किसान सभेच्या संघर्षाची आणि लोकशक्तीच्या एकजुटीची ठोस फलश्रुती मानली जात आहे. एक छोटा वाटणारा निर्णय, गावाच्या जीवनरेषेसाठी खऱ्या अर्थानं गेमचेंजर ठरला.

Post a Comment

0 Comments