"तो म्हणाला – ‘माझी गाडी बंद आहे’… पण नजरेत रक्त होतं!"



गणपूरच्या रस्त्यावर घडला थरार; चाकू हल्लेखोरास 2 वर्षांची शिक्षा




गडचिरोल्ली– एक शांत सकाळ, एक नेहमीसारखा एस.टी. प्रवास… पण अचानक एक वाक्य सगळं उलटवून टाकतं – “माझी गाडी बंद आहे”. हे वाक्य म्हणणाऱ्या इसमाच्या नजरेत मात्र असतं रक्त! आणि काही क्षणांत रस्त्यावर सुरू होतो रक्तरंजित थरार!


9 मार्च 2019 रोजी प्रविण तलांडे हे एस.टी. बस (MH-06-C-8843) चालवत असताना गणपूर शाळेसमोर रस्त्यातच मोटारसायकल उभी करणारा इसम — सुनिल कोहपरे — म्हणतो, “माझी गाडी बंद आहे”. मात्र गाडी हलवण्याचा प्रयत्न करताच तो संतापतो. कॉलर पकडतो. शिवीगाळ करतो. आणि... चाकू बाहेर काढतो!


चालकावर जीवघेणा हल्ला केला जातो. प्रतिकारात चालक जखमी होतो. रस्त्यावर थरार उभा राहतो. प्रवाशांच्या मदतीने चालकाला वाचवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जातं.


चामोर्शी पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून कोहपरेला अटक केली. सत्र खटला क्रमांक 115/2019 मध्ये सरकारी वकील सचिन कुंभारे यांच्या युक्तिवादावर आधारित साक्षीपुराव्यांच्या आधारे गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.




22 एप्रिल 2025 रोजी न्यायमूर्ती विनायक जोशी यांनी आरोपीला 2 वर्षांचा सश्रम कारावास व 20,000 रु. दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम जखमी चालकाला देण्याचा आदेशही देण्यात आला.

Post a Comment

0 Comments