ब्रम्हपुरी, ता. प्रतिनिधी – अनिल कांबळे
तालुक्यात जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे रूपांतर केवळ योजनेपुरते मर्यादित न राहता, एक शेतकरी चळवळ म्हणून व्हावे, असे स्पष्ट मत कृषी पर्यवेक्षक अमित केराम यांनी व्यक्त केले. अड्याळ येथे आयोजित प्रकल्पाच्या सूक्ष्म नियोजन आराखड्याच्या प्रसंगी ते बोलत होते.
ब्रम्हपुरी तालुक्यातील 49 गावे या प्रकल्पात सहभागी असून, सर्व गावांमध्ये लोकसहभागातून नियोजन प्रक्रिया राबवली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अड्याळ येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जनजागृतीसाठी मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले.
प्रकल्पाच्या टप्पा 2 अंतर्गत सूक्ष्म नियोजन प्रक्रियेत आवश्यक बाबींवर शेतकरी बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या कार्यक्रमाला प्रभारी मंडळ अधिकारी विनोद सोरदे, उपसरपंच नामदेव लांजेवार, कृषी सेवक सुनीता भोयर, कृषी सहाय्यक कु. ज्योती गुरनुले, तेजीना चौधरी, सुजाता येरमा, शिल्पा वासनिक, वैशाली ठवरे, प्रगतिशील शेतकरी विजय भोयरजी, स्वयंसेवक निर्गुणा मोहर्ले, ग्रामपंचायत सदस्य विनोद वासनिक, गिरीधर आलबनकर, सुचिता नवघरे, श्वेता भोयर व ग्राम कृषि विकास समिती सदस्य तसेच अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे गावपातळीवर शेतीच्या नव्या दिशा ठरविण्यास मदत होणार असून, बदलत्या हवामानास सामोरे जाण्यासाठी शाश्वत शेतीचे मार्ग खुले होतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
0 Comments