गडचिरोली – पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ताडगाव पोलीस ठाणे हद्दीतील कुडकेली जंगल परिसरात सुरू असलेला बनावट देशी दारू कारखाना उद्ध्वस्त करत 39.31 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
गोपनीय माहितीनुसार काल 14 मे रोजी कारवाईची आखणी करण्यात आली. पोलिसांनी जंगल परिसरात घेराव घातला असता एक चारचाकी वाहन घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न करताना सापडले. तपासणीत देशी दारूच्या बॉक्ससह अनेक साहित्य सापडले.
आज 15 मे रोजी सकाळी पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. कारवाईत मोठ्या प्रमाणावर स्पिरीट, भरलेले ड्रम, बाटल्या, चारचाकी, मोटारसायकल, जनरेटर, सिलींग मशिन, रासायनिक साहित्य इत्यादी जप्त करण्यात आले.
घटनास्थळावरून चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. भगतसिंग दुलत करीत आहेत.
0 Comments