कोडीगावच्या विहिरीत कचरा सरपंच-ग्रामसेवकाच्या दुर्लक्षाचं भयावह सत्य उजेडात!






आंबटपल्ली : गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोडीगाव गावातील सरकारी विहीर सध्या धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. भर उन्हाळ्यात पाण्याऐवजी कचरा, दुर्गंधी आणि मृत जीव-जन्तूंचा साठा – ही दृष्ये पाहून गावकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही विहीर अनेक कुटुंबांसाठी एकमेव पाण्याचा स्रोत आहे, मात्र याकडे ग्रामपंचायतीकडून संपूर्ण दुर्लक्ष होत आहे.


कोडीगाव हे आंबटपल्ली गट ग्रामपंचायती अंतर्गत येत असून एक सरपंच आणि एक वार्ड सदस्य असे एकूण दोन पदाधिकारी  स्थानिक या गावचे रहिवासी असूनही विहिरीची ही भीषण अवस्था त्यांच्या नजरेसमोर असूनही कोणतीही तातडीची उपाययोजना करण्यात आलेली नाही.हे दूषित पाणी पिलं तरी मरणार अन नाही पिलं तरी मरणार. गावकऱ्यांना असा पेच पडला आहे कि पाणी पिऊन मरावं कि न पिता मरावं. ही बाब अत्यंत गंभीर असून अनेक कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न आहे.




या प्रकरणावर भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वदीप वाळके यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

“ही पाण्याची बाब अत्यंत गंभीर असून जर त्वरित निवारण झाले नाही, तर सरपंच व ग्रामसेवकांविरोधात गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली जाईल,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.


ते पुढे म्हणाले, “वनतस्करी सोडून जर गावच्या समस्यांकडे लक्ष दिले, तर भलंच होईल; अन्यथा लोकशक्ती काय करू शकते हे दाखवून देण्यात येईल. जनता फसवणूक सहन करणार नाही.”


ही केवळ विहिरीची नव्हे, तर संपूर्ण ग्रामपंचायतीच्या कामकाजावर उठलेलं धक्कादायक प्रश्नचिन्ह आहे. कोडीगावकर आता शांत बसणार नाहीत, हे निश्चित!


२-२  पदाधिकारी एकाच गावातील असून जर परिस्थिती अशी असेल तर बाकी अख्या ग्रामपंचायतीच काय हाल असेल यावरून आपण समजू शकतो. आणि ही पहिली बाब नाही तर मागील काही महिन्यांपूर्वी देखील याच गावातील दलित वस्तीतील हातपंपाची अवस्था देखील आपणास माहीत असेलच. कराव तर ग्रामस्थांनी किती सहन करावं. आता मात्र ग्रामस्थ यापुढे सहन करणार नाही हे मात्र नक्की!

Post a Comment

0 Comments