भाताच्या पिशवीतून 'HTBT'चा ब्लास्ट!



कृषी विभागाची धडक कारवाई 60 किलो अनधिकृत कापूस बियाणे जप्त



प्रतिनिधी//राहुल दोंतुलवार


 अहेरी;- तालुक्यातील मुत्तापूर गावात भाताच्या पिशवीतून HTBT कापसाच्या बियाण्यांची बेकायदेशीर तस्करी उघडकीस आली आहे. तेलंगणातील एका संशयित विक्रेत्याने शेतकऱ्याच्या घरी ठेवलेला ६० किलो बियाण्यांचा साठा कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला.


गुप्त माहितीच्या आधारे रात्री अचानक धाड टाकण्यात आली. तपासणी दरम्यान भाताच्या बॅगमध्ये लपवलेले अनधिकृत कापूस बियाणे आढळले. बाजारमूल्य सुमारे १.२०लाख रुपये. पोलीस ठाणे अहेरी येथे साडेदहाच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला असून तस्करीत सामील असलेल्या व्यक्तींचा तपास सुरू आहे.


ही कारवाई जिल्हाधिकारी अविशांत पंडा, पोलीस अधीक्षक निलोत्पल, सीईओ सुहास गाडे, कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, मोहीम अधिकारी आनंद पाल, कृषी अधिकारी भगवान गावडे व पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे यांनी केली.

Post a Comment

0 Comments