आंबटपल्ली- गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेला चिचेला हा अख्खा गावचं रडतोय पिण्याच्या पाण्यासाठी!
चिचेला या गावातील वार्ड क्र. २ मधील पाण्याची टाकी मागील १ महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे या वार्डातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप त्रास करून दूरवर असलेल्या नळावरून किंवा विहिरीतून पाणी आणण्याची वेळ आलेली आहे. ज्यांना दूरवर जाऊन पाणी आणणे शक्य नाही अशा लोकांनी अंगणवाडी केंद्राजवळ असलेल्या विहिरीतून पाणी घेऊन जात आहेत. परंतु या विहिरीत झूळपी जंगल आहे आणि त्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवजंतू आहेत. गावकऱ्यांच्या माहितीप्रमाणे जवळ जवळ एक वर्षांपासून ब्लिचिंग पावडर सुद्धा या विहिरीत टाकण्यात आलेले नाही. इतकं असून सुद्धा नाईलाजाने काही गावकरी याच विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरत आहेत तर काही अंघोळ व इतर कामासाठी याच पाण्याचा वापर करीत आहेत.
वार्ड मेंबर काही लक्ष देईना!
इतकी जीवघेनी दैनी अवस्था गावकऱ्यांची होत असल्याचे वारंवार वार्ड सदस्य विलास सडमेक यांना सांगूनही त्यांना गावकऱ्यांच्या जीवाची पर्वा नाही. फक्त नावापुरतेच वार्ड सदस्य, काम मात्र शून्य!
गावकरी मागत आहेत पिण्याच्या पाण्याची भीक!
चिचेला गावातील वार्ड क्र. २ मधील नागरिक पिण्याच्या पाण्याची भ्रष्ट ग्रामपंचायतीकडे जणू भिकच मागत आहेत परंतु यानां काही जागच येईना!
आंबटपल्ली ग्रामपंचायतमध्ये चाललं तरी काय? काहीच कळेना! अख्खा आंबटपल्ली ग्रामपंचायतच कोणत्या - ना - कोणत्या समस्येने त्रस्त आहे. परंतु एकीकडे नागरिकांचे हाल बेहाल होत असतांना या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना झोप कशी लागते हेच कळेना.
अख्खा ग्रामपंचायतच कोणत्या- ना- कोणत्या समस्येच्या विळख्यात सापळलेला आहे. कुणास ठाऊक हे चक्र कधी संपणार आणि गावकऱ्यांचे अच्छे दिन कधी येणार!
येत्या ३ दिवसात जर पिण्याच्या पाण्याची सोय करून दिले नाही तर गावकरी महिला ग्रामपंचायत कार्यालयासमोर "घागर भरो आंदोलन" उभारणार असल्याचे महिलांनी इशारा दिला आहे. या वेळी चिचेला येथील निलिमा मारोती मेश्राम, सुनीता रघुनाथ आलाम, तुळसाबाई गणू कोडापे, चंद्रकलाबाई नारायण टेकाम, अक्कूबाई आत्राम, ताराबाई रामदास आलाम, कांताबाई सुरेश तुंकलवार, पौर्णिमा मारोती मेश्राम,तुळसाबाई रामदास आलाम,बहिणाबाई तुंकलवार, चंदाबाई रवी टेकाम, छायाबाई खुशाल तुंकलवार हे उपस्थित होते.
या समस्येबाबत ग्रामपंचायत आंबटपल्ली येथील सचिवांना भ्रमध्वनीद्वारे आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केले असता सचिवांनी बेजवाबदार उत्तर दिले उत्तर ह्या प्रमाणे होते की आम्ही करू आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला लेबर नाही भेटत, मेकॅनिकल नाही भेटत ज्या दिवशी लेबर भेटेल त्या दिवशी करू दोन दिवसात होते का?
प्रश्न असा पडतो की;- गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतीची स्थापना केली व गावकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्याकरिता गावातील समस्या सोडवण्यासाठी ज्यांची नेमणूक केली तेच बेजबाबदार असतील तर अश्या निष्क्रिय लोकांना पदावर राहण्याचा अधिकार काय? गावातील नागरिक आपल्या समस्या घेऊन जातील तर कुणाकडे?
0 Comments