वनविभाग झोपलेलं...तस्करांची चांदीच - चांदी!





कोडीगाव जंगलात ३० झाडांची बिनधास्त कत्तल!

कोडीगाव– कोडीगाव जंगलात तब्बल ३० झाडांची निर्दयपणे कत्तल करण्यात आली असून, वनविभागाच्या दुर्लक्षामुळे तस्करांची मनमानी वाढली आहे. सहाय्यक वनपरिक्षेत्र  कार्यालय गोमणी येथील गोमणी बिट वनरक्षक बोरेकर आणि वनपाल सिडाम यांच्या क्षेत्रात घडलेल्या या प्रकाराने वनविभागाच्या निष्क्रियतेचा चिघळलेला चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.


सदर वृक्षतोड विटाभट्टीसाठी करण्यात आली असून, रात्रंदिवस ही कत्तल सुरू होती, मात्र वनविभागाला कानावर वारा सुद्धा गेला नाही, ही बाबच खळबळजनक आहे. जवळपासच्या गावकऱ्यांनी अनेक वेळा आक्षेप घेतला, तरीही संबंधित अधिकारी ठार गप्प! यावरून असे निदर्शनास येते कि या वनविभागातील अधिकाऱ्यांच्याच संगनमताने इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. 

   कारण सदर बाब वारंवार वनविभागाच्या वनपाल सिडाम व वनरक्षक बोरेकर यांना माहिती देऊनही या तस्कऱ्यांवर कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही आणि त्यामुळेच हे तस्कर पुन्हा पुन्हा वृक्षतोड करून आपले विटाभट्टी जाळण्यात  झाले  व्यस्त अन वनविभाग मात्र सुस्त!


कोट्यावधींच्या जंगलसंपत्तीचा विध्वंस आणि कोणतीही कारवाई नाही – हा प्रकार म्हणजे तस्करांना संरक्षणच दिलं जातंय का? असा सवाल आता उपस्थित होतोय. झाडांची कत्तल करून निसर्गावर आघात करणाऱ्या तस्करांना थांबवण्याऐवजी वनविभाग डोळेझाक करून त्यांना सहकार्य करून मोकळं रान देतोय.


स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, कर्तव्यचुकार वनअधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी जोर धरू लागली आहे. ही केवळ वृक्षतोड नाही, तर जंगलाच्या भवितव्यावर उठवलेली कुऱ्हाड आहे! 


सरळ सवाल –  

मोकाट झाले तस्कर,  हातात हात घालून तमाशा बघत आहेत सिडाम आणि बोरेकर!

Post a Comment

0 Comments