कोडीगाव मूलचेरा कोडीगाव येथील जंगलात जवळपास ३० झाडांची बेधडक तोड करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सहाय्यक वनपरिक्षेत्र गोमणी अंतर्गत येणाऱ्या गोमणी बिटमधील वनरक्षक बोरेकर आणि वनपाल सिडाम यांच्या क्षेत्रात घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे वनविभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रात्रंदिवस सुरू असलेली ही वृक्षतोड विटाभट्टीसाठी केल्याचे निष्पन्न झाले असून, आजूबाजूच्या गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊनही कोणीही काहीच हालचाल केली नाही. यामुळे वनविभागाच्या संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होऊनही वनविभाग कानाडोळा करत असल्यामुळे तस्करांचा माज वाढला आहे.
तस्कर मोकाट – वनविभाग हातात हात घालून तमाशा बघतोय?
वनपाल सिडाम व वनरक्षक बोरेकर यांच्याविरोधात तात्काळ कारवाईची मागणी नागरिक करत असून, "ही केवळ वृक्षतोड नसून जंगलाच्या भवितव्यावर कुर्हाड आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. वनविभागाने तात्काळ तपास करून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
मानवाधिकार परिषदेची तिव्र प्रतिक्रिया – आंदोलनाचा इशारा!
या गंभीर प्रकाराची दखल भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष वाळके यांनी घेतली असून, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तत्काळ कारवाई झाली नाही, तर जोरदार जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरळ सवाल –
तस्कर मोकाट... आणि बोरेकर-सिडाम ‘बिनधास्त’?
0 Comments