मुलचेरा येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा



मुलचेरा: या कार्यक्रमाचे संकल्पना मा मंत्री श्री मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास उद्योजक्ता व वाणिजक्ता विभाग यांच्या  होता वीर राजा रामजी गोंड मर्सकोले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलचेरा येथे दिनांक 06/ 06/ 2025 रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी उपस्थित मान्यवर मान्यवराचा स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे दृकश्राव्य प्रणालीद्वारे प्रशिक्षणार्थी अतिथींना उद्देशून दिलेला संदेश दाखवण्यात आले तसेच कौशल्य विकास उद्योजकता तथा वाणिज्यता विभागाचे अपर सचिव सौ मनीषा वर्मा यांचे दृकश्राव्य प्रणालीद्वारे सर्व उपस्थितीना व प्रशिक्षणार्थींना दाखविण्यात आली कौशल्य विकास विकासावर आधारित सुरज गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला लाभलेले वक्ते मा श्री जयप्रकाश जी शेंडे रा स्व संघाचे ग्राम विकास विभाग प्रमुख यांनी प्रशिक्षणार्थी त्यांना व सर्व मान्यवर उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व तसेच कुटुंब प्रबोधन , स्वदेशी विचारधारा सामाजिक समरसता व विविध विषयावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कू. रुतुजा खापे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुलचेरा उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संस्थेचे सर्वसाधारण प्राचार्य श्री ए डी शेंडे तसेच संचालन जे आर झरले सिल्पनिदेशक यांनी केले. सदर कार्यक्रमाला संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री विनोद बानोत व सुमित गणपती हे उपस्थित होते या कार्यक्रमाकरिता  संस्थेचे श्री आशिष लोखंडे श्री प्रणव वाघ, श्री आशिष विखे, श्री जितेंद्र सरले, श्री जितेंद्र पंचफुलीवार, श्री धीरज वाटे, श्री देवेंद्र प्रसाद श्री शुभम तालावार सुंदर पुणे व हेमलता  कन्नाके यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments