अहेरी;-सध्या मनुष्य वन्यजीव संघर्ष सर्वत्र दिसून येत आहे,मात्र कुत्र्यांच्या हल्ल्यापासून वाचवून आणलेल्या चितळाच्या पिल्लास जीवदान देऊन वनविभागाच्या सुपूर्द करून मानसुकीचे दर्शन घडविले आहे.
अहेरी येथील युवक चेतन कोकावार हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना काही कुत्रे चितळाच्या कळपामागे लागले होते त्यातच चितळाचा एक लहान पिल्लू रस्त्याकडे धावत आला आणि चेतन कोकावार यांनी पिल्लाच्या दिशेने येणारे कुत्रे परतवून लावले आणि त्या पिल्लास घरी घेऊन आले.तत्काळ त्यांनी याची सूचना वन विभागाचे कर्मचारी देवेंद्र नायडू व वनरक्षक सी.डी.नागुलवार यांना दिली त्यावर कोकावार यांच्या घरी येऊन चितळाचे लहान पिल्लू आपल्या ताब्यात घेऊन प्रथम उपचारासाठी नेले.
एकीकडे चितळाची शिकार करण्याच्या व त्याचे मांस मिळण्याच्या घटना नेहमी घडत आहे मात्र चितळ्याच्या पिल्लास जीवदान देऊन चेतन कोकावार यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
0 Comments