आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तहसील कार्यालय एटापल्ली येथे योगाभ्यास कार्यक्रम संपन्न



एटापल्ली (21 जून 2025):आज सकाळी 5.30 वाजता तहसील कार्यालय एटापल्ली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत योगासने व प्राणायामाद्वारे आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला.

या योगदिन कार्यक्रमाला मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब, मा. तहसीलदार साहेब एटापल्ली, तालुका आरोग्य अधिकारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण योग शिक्षक श्री. महादेव करमरकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले योग सत्र होते. त्यांनी उपस्थितांना योगाचे विविध प्रकार, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले.

कार्यक्रमाची सांगता सर्व सहभागी अधिकाऱ्यांनी नियमित योगाभ्यासाची प्रतिज्ञा घेऊन केली.

योगदिनाच्या निमित्ताने आरोग्यविषयी जनजागृती करत योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments