छत्रपती शाहूंना अभिवादन... पण या जयंती कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा जाणवली!"



निकतवाडा, २६ जून – सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था व महिला मंडळ बचत गटाच्या वतीने समाज मंदिर, निकतवाडा येथे छत्रपती शाहू महाराज जयंतीचे भव्य आयोजन पार पडले. अभिवादन, व्याख्यान आणि सामूहिक सहभागातून इतिहासाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणाने करण्यात आली. प्रास्ताविक हिवराज फुलझेले यांनी केले. अध्यक्षस्थानी गीता कपिलदास बांबोळे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून गोकुलदास वाकडे, ममता देवतळे, संध्या वाकडे, दर्याबाई खोब्रागडे, वेणुबाई देवतळे, कपिलदास बांबोळे, रोहिदास वाकडे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित महिलांनी आणि ग्रामस्थांनी एकजुटीने सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.

कार्यक्रमाचे आभार संस्था सचिव प्रियंका शेंडे यांनी मानले.

या सोहळ्यात केवळ अभिवादन नव्हते, तर जाणवली एक सशक्त सामाजिक जाण...!

Post a Comment

0 Comments