गडचिरोली;-राजकारणात सध्या मोठा हालचालींचा काळ सुरू असताना, भारतीय जनता पक्षाने आज आपल्या राज्य परिषद सदस्यांची यादी जाहीर करत राजकीय वर्तुळात हलचल निर्माण केली आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांची थेट राज्य परिषदेत वर्णी लागली आहे!
राजकीय खेळात नेहमी सडेतोड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे आत्राम, आता संघटनेच्या निर्णायक भूमिकेत झळकणार आहेत.
या नियुक्तीमुळे जिल्ह्यात उत्साहाचं वातावरण असून समर्थक, कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
“नेतृत्व, अनुभव आणि जनतेशी जोडलेली नाळ – या सगळ्याचा योग्य सन्मान” अशा प्रतिक्रिया सर्वदूर उमटत आहेत.
गडचिरोलीच्या राजकारणात ही निवड ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता अनेक जाणकार वर्तवू लागलेत!
0 Comments