ब्रेकिंग न्यूज "वनविभागात 'मटन' पार्टीचा भंडाफोड!" आलापल्लीच्या 'हरण'खोर कर्मचाऱ्यांवर तलमले यांचा झटका – दोन जेरबंद, इतर 'माशां'चा शोध सुरू!



आलापल्ली (जि. गडचिरोली) –
वनरक्षणाची जबाबदारी असलेल्याचांनी वन्यप्राण्यांचे 'संपूर्ण थाळी'त रूपांतर केल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. आलापल्ली एफडीसीएम विभागातील काही कर्मचाऱ्यांनी हरणाचा शिकार करून मटन शिजवून खाल्ल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांनी कठोर पावले उचलत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र ही केवळ सुरुवात असल्याचे सूत्रांचे म्हणणे असून, मटन पार्टीमध्ये इतरही "मोठे मासे" सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाच्या सावलीत हा प्रकार घडल्याने, "दिव्याखाली अंधार!" अशीच स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी दिलेल्या विश्वासाचा गळा घालणाऱ्यांवर आता काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण तपशील काही क्षणांत... सस्पेन्स कायम!

Post a Comment

0 Comments